भाषजी,

"थोडेफार संगीत कळणारा"  हे शब्द वाचल्याक्षणीच आपल्या जाणकारीचा अंदाज आला व काहीसा धाकही बसला.
माझ्या बुद्धीच्या आवाक्यात येईल एवढीच प्राथमिक माहिती सध्या येथे देऊ पहात आहे तेव्हा लगेच सहाय्याची आवश्यकता वाटत नाही.
तरीही वर तात्यांना जी टीकाटिप्पणी देण्याची विनंती केली तीच आपल्यालाही आहे.
कृपा व दृष्टी या दोन्हीची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण पूर्ण कराल असा विश्वासही आहे.
आपल्यासारख्यांच्या बळावर तर हे काम हाती घेतले आहे.
बाकी माझी पहुंच जिथे संपेल तिथपासून सुकाणू आपल्यासारख्यानाच हाती घ्यावे लागेल, ती तयारी असूदे.
दिगम्भा