माझ्या माफक अपेक्षांच्या पुढे कित्येक योजने असा आपणा सर्वांचा प्रतिसाद आल्यामुळे भारावून गेलो आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मी संगीतातला कोणी ज्ञानी पुरुष नाही हे उघड आहे, केवळ "जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे" या प्रेरणेने वाटचाल सुरू केली आहे. माझ्याकडे नवीन काही नाही, आधींच्या "धन्यांचा (श्रीमंतांचा) हा माल" आहे, तो आपल्यापर्यंत तोडफोड न करता व्यवस्थित पोचवण्याचे बळ माझ्या अंगी यावे व रहावे एवढीच इच्छा.
इतक्या लोकांच्या शुभेच्छा नक्कीच कामी येतील हा विश्वास धरून पुढच्या लेखाकडे वळेन म्हणतो.
दिगम्भा