भारतीयांनी एकमेकांत भारतीय भाषा बोलाव्यात हे अनुचे म्हणणे मला पटले. तरी दाक्षिणात्यांना किंवा कोणालाच हिंदी किंवा कुठलीही इतर भाषा शिकण्याची सक्ती नसावी असे मला वाटते. चेन्नैला जाऊ तर तमिळ शिकू, गोहाटीला जाऊ तर आसामी आणि मुंबईला जाऊ तर मराठी शिकू हे बरोबर वाटते. आणि भारताबाहेर भेटलो तर बहुमताची असेल ती भाषा.
सर्वसाक्षी, 'किधर है यार' म्हणणारे लोक मुंबईत मिळत असतील बहुधा; मी आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या ज्या छोट्या शहरांत राहिले आहे, तिथे कुणीच मला अशी सढळ हिंदी वापरताना आढळले नाही. उलट परप्रांतीय लोक ४/६ महिन्यात मराठीतून बोलू लागल्याचे अनुभवले आहे.