अनु,

भन्नाट आहे लेख. जे अनुभवू शकले नाही ते तुझ्यामुळे अनुभवल्याचा आनंद मिळवता आला. मनापासून धन्यवाद.

११ वाजता परीक्षा असली तरी सकाळी ७ पासून १० पर्यंत मी ऑफीसमध्येच असायची ! माझ्या बॉसला ( माझे बाबा ! ) विचारलं की मी परीक्षेला जाते.. तरी खूप ओरडायचे.. "लवकर परत ये.. खूप काम आहे.." म्हणायचे ! परीक्षेचीच ही गत तर फेअरवेलची काय कथा !!! ऑफीसमधल्या कामांमुळे मला सिनियर्सच्या फेअरवेल पार्टीला नव्हतं जाता आलं आणि जेव्हा मला फेअरवेल मिळणार होतं तेव्हा मला अगदी ऐन दिवशी कळलं त्यामुळे साडी वगैरे शोधत बसायला वेळच नव्हता.. सरळ पंजाबी ड्रेस, वेणी वगैरे काकूबाई स्टाईलने गेले होते मी ! पोहोचले तेव्हा बघितलं की सगळ्याजणी अगदी नव्या नवरीसारख्या सजलेल्या !! मोबाईल हातात घेऊन फिरणाऱ्या माझ्या त्या मैत्रिणींना मी त्यांची मैत्रिण आहे हे स्वीकारणं त्यवेळेस अपमानास्पद वाटत होतं.. त्या मला टाळत होत्या. तो एक अगदी जब्बरदस्त अनुभव होता.. कॉलेजबद्दलचं अनुभवकथन स्पर्धेत काय ते फक्त एक बक्षिस मिळालं होतं बस्स.. बाकी तिथून शक्य तितक्या लवकर सटकून घरी परत यायचं होतं. दुसऱ्या दिवशी काम होतं ऑफीसमध्ये !