एकटा हिटलरच काय असे कितीतरी राजे आणि शहा होवून गेले ज्यांनी लाखो लोकांची कत्तल केली. माणसाची माणूस म्हणून असलेली किंमत शून्य ठरवली. लोकांना गुलाम बनवले. या सर्वांची नावे चांगल्या किंवा वाईटाबरोबर कधीच घेतली गेली नाहीत. पण हिटलर मागच्या काही वर्षातील उदाहरण असल्यामुळे हि चर्चा केली जाते आहे. हिटलरने ठार केलेल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त लोकांना मोगलांनी भारतातच ठार केले होते तरी आज त्यांची प्रतिके जपून ठेवली जातात आणि मोगलांचे गोडवे ही गायले जातात. त्यापेक्षा हिटलरने केलेल्या नरसंहाराची जवाबदारी स्वीकारली तरी होती त्याचा व्यवहार छुपा नव्हता. त्याने केलेले कृत्य हे अत्यंत निघृण आणि अक्षम्य असले तरी तो एक सच्चा मनुष्य होता जो जगासमोर केलेल्या पापाची कबुली देण्यास कचरला नाही.