सर्वसाक्षींचा प्रतिसादः

या चर्चेच्या २ अवृत्ती झाल्या होत्या. दुसरीकडे सर्वसाक्षींनी दिलेला प्रतिसाद मी कॉपी करून ठेवला होता. ती चर्चा काढुन टाकली जाईल असे वाटतच होते. आता तो प्रतिसाद खाली देत आहे.

प्रतिसाद, चांगला वाटला व तो इथे यावा म्हणुन हा प्रपंच!!

सर्वसाक्षींची पूर्व परवानगी घेतली नाही, त्याबद्दल क्षमस्व.

--सचिन

--------------------------------------------------------

जर निरपेक्ष दृष्टीने पाहीले तर हिटलर मध्ये अनेक असामान्य गुण आढळतात. मात्र हिटलरने ज्यूंचा अमानुष संहार केल्याने तो त्याज्य व निषेधार्ह ठरला आहे आणि त्यामुळेच त्याचे जे काही गुण आहेत ते दाखविणारा सुद्धा टीकेस पात्र ठरतो.

हिटलरने ज्यूंचा व पर्यायाने मानवतेचा जो काही संहार केला तो कुठल्याही परिस्थितीत समर्थनीयच नव्हे तर क्षम्यही नाही. मात्र त्याला अमानुष कुणी बरे म्हणायचे? हिटलरने केलेला ज्यूंचा छळ व इंग्रजांनी अंदमानात केलेला क्रांतीकारकांचा छळ यात फरक काय? तरीही तत्कालीन प्रस्थापित नेत्यांनी भारतीयांना मानवतावादी दृष्टीकोनातून महायुद्धातइंग्रजांच्या वतीने नराधम हिटलर विरूद्ध लढायला प्रेरीत केले. खरे तर दोघेही नराधमच. जालीयनवाला बाग व हिटलरने केलेले सामुहीक संहार यात फरक का केला जावा? इंग्रजांनी ब्रह्मदेशच्या जंगलातून माघार घेणाऱ्या आझाद हिंद्च्या सैनिकांवर विमाने खाली उतरवीत इंधन जंगलावर फवारले व मग वर झेप घेताना बॉम्ब टाकले ज्यायोगे हे सैनिक जीवंत जळावेत. हे काय मानवतेचे द्योतक?

अमेरिकेने तर अणुबॉम्ब टाकून नरसंहाराला 'मानवतेचे' रूप दिले. पुढे व्हिएतनाम मध्ये असंख्य अत्याचार स्थानिक जनतेवर केले. इराकवरचा हल्ला व त्यासाठी दिलेले व खोटे ठरलेले कारण तर जगजाहीर आहे.

तात्पर्य इतिहास हा नेहेमी जेतेच लिहीतात व त्यामुळे हिटलर नराधम व ब्रिटन व अमेरिका हे मानवतेचे पाईक असे भ्रामक दृश्य जागापुढे उभे केले गेले आहे.

अपकृत्ये बाजूला ठेवून जर निव्वळ गुण बघायचे तर

 

प्रखर राष्ट्रभक्ती, कणखर नेतृत्व, अप्रतिम नेतृत्त्व गुण, असामान्य जनप्रेरणा, ऊत्कृष्ट नियेजन-दूरदृष्टी, लाभ रहीत सत्ता हे हिटलरचे गुण वाखाणावे लागतील.

मात्र आत्मेकेंद्री वृत्ती, अहंभाव, राक्षसी महत्त्वाकांक्षा, स्वतःच्या हट्टासाठी लाखो सैनिकांचा रशियात दिलेला बळी, निरपराध माणसाना स्वतःच्या मर्जीखातर ठार करणे, नरसंहार/ वांशिकवाद, जागतीक संपत्ती व साधनांचा अक्षम्य अपव्यय, लहरी स्वभाव व स्वतःच्या निष्ठावंतांवर केलेला अन्याय हे अवगुण होते. एकंदरीत वाईट बाजू अधीक असल्याने जगाला त्याच्या गुणांची कदर करणे पचण्यासारखे वा रुचण्यासारखे नाही.

यापैकी अनेक गुण त्याचा एक नंबर शत्रू असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानाने - चर्चिलने जाहीरपणे मान्य केले आहेत.

भारतात हिटलर येणे अपेक्षीतच आहे या विधानातून आपल्याला नक्की काय सांगायचे आहे? कृपया सविस्तर सांगा.