"संगीताचा आस्वाद कसा घ्यावा" या विषयाबद्द्ल बरेच दिवस माझ्याही मनात काहीतरी घोळत होतं. अर्थात हा विचार करताना माझ्या मनात जुन्या मराठी व हिंदी लोकप्रिय गीतांमधल्या सौंदर्यस्थळांबद्द्ल चर्चा घडवून आणावी असा मानस होता. पण व्यस्त दिनचर्येमुळे विचार हा विचार स्वरुपातच राहिला.
आपण फारच चांगला उपक्रम सुरु केला आहात. शास्रीय संगीतावर प्रबोधन होईलच. पण जाता जाता या शास्त्राचा जुन्या संगीतकारांनी सुगम संगीतात कसा चपखल वापर केला आहे हे उदाहरणादाखल विषद केलंत तर चर्चा अधिक रंजक होईल असं वाटतं.
पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.
ही लेखमाला वाचून असंख्य "कानसेन" निर्माण होवोत हीच सदिच्छा. भारतीय अभिजात संगीत तरुन (आणि "तरुण") राहण्यासाठी आज कानसेनांचीच जास्त गरज आहे.
आपला
(संगीतप्रेमी) विवेक काजरेकर.