इथे एक गल्लत होते आहे. इतिहासमधे बरेच संहार झाले आहेत. मग ते मोगलांनी केलेले असो किंवा अमेरिकेने. हे सर्वही तितकेच निंदनीय आहेत. पण इथे चर्चा हिटलरविषयी आहे.
बाकीच्यांनी अमानुषता केली म्हणून हिटलरची अमानुषता कमी होत नाही.
त्याच्या मते त्याने केलेल्या संहारामधे काही चूक नव्हती. हा त्याचा सच्चेपणा नसून अट्टाहास होता. आर्य वंशाची (तथाकथीत) श्रेष्टता सिद्ध करण्यासाठी त्याने संशोधकांना नियुक्त केले होते. त्यांच्या मते आर्य वंश हा अटलांटिस संस्कूतीचा वंशजांपासून उपजलाहोता. हे सिद्ध करण्यासाठी काही जर्मन संशोधक तिबेट्पर्यंत गेले होते.
भारतात हिटलरची आवश्यकता आहे हे विधान माझ्या समजण्यापलिकडचे आहे.