जयंतराव,
साखर नेणाऱ्या मुंगीला
आवडलं....
जुन्या खोडांना भिजवावं पण म्हाताऱ्यांना भिजवू नये हा विरोधाभास वाटला... अर्थात जर 'जुनी खोडं' आणि 'म्हातारे' यांचा परस्परसंबंध न लावता त्यांच्या त्या त्या अर्थानं बघितलं तर योग्यच आहे.
कविता एखाद्या पाडगावकरांच्या बोलगाण्यासारखी सुंदर आणि सर्वस्पर्शी झाली आहे. शाळेतली मुलं, छत्रीतली दोघं.. मातीतली बीजं... सुंदर!
- कुमार