माझा मुख्य मुद्दा बोलीभाषेविषयी होता.आणि त्यादृष्टीने मी संत बहिणाबाईंचा(चौधरीच)उल्लेख केला,त्यानी जसे अहिराणी भाषेत अभंग लिहिले तसेच पूर्वीच्या संतानी त्यांच्या भाषेत का लिहिले नाहीत असा माझा प्रश्न होता.तुकारामांचाच विचार करायला गेल्यास त्या काळचे मराठी बखरीतुन जे वाचायला मिळते किंवा शिवाजीमहाराजानी आपल्या सैन्यास दिलेला सल्ला किंवा संभाजीस लिहिलेले पत्र पाहिले तर त्या मराठी भाषेचे वळण अगदीच वेगळे वाटते.आणखी स्पष्ट करायला गेले तर आजकाल मनोगतमध्ये (शुद्धलेखनचिकित्सा उपलब्ध असूनही)सुद्धा जेवढे शुद्ध मराठी लिहिले जात नाही तेवढी शुद्ध भाषा संतांच्या काव्यात कशी आढळते अगदी चोखामेळा,जनाबाई या ''यातिहीन''(हा शब्द चोखोबांचाच आहे)यांच्या अभंगात सुद्धा !आता तुकोबांचाच एक अभंग घेऊ,अणुरेणुया थोकडा तुका आकाशायेवढा। सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी।गिळुन सांडिले कलेवर।भव भ्रमाचा आधार।यातील शब्द अवघड आहेत हे कोणीही मान्य करेल अगदी आजही लोनीपानी करणारे सुशिक्षित लोक (यात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही)दिसतात असे असताना इतकी शुद्ध भाषा त्यांच्या अभंगात कशी आढळते हे कोडेच  आहे.एका मनोगतीने अशी भाषाच लिखाणाला वापरावी असा संकेत असल्याचे म्हटले आहे,मग मी त्याना उलट हा प्रश्न विचारेन की आपल्या मनोगतवरही अशीच शुद्ध भाषा वापरण्याचा संकेत असून बरेचजण तो पाळताना दिसत नाहीत असे का?