मा. दिगम्भा,
आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि माझ्यासारख्यांना अतिशय उपकारक आहे.
ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण अजिबात समजत नाही;
वरील वाक्य वाचून फार आनंद झाला, आणि आता खूप दिवस जी माहिती पाहिजे होती ती मिळणार याची खात्री वाटली.
आत्ता कुठलेही वाद्य घ्यायची स्थिती नाही पण हे लेख संग्रही ठेवीन.
आपल्या उपक्रमातून संगीताची समज निर्माण होवून शास्त्रीय संगीत ऐकताना ते काय आहे, राग कसा असतो, त्याची मांडणी कशी होते, इत्यादी गोष्टी समजतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे (माझ्यासारख्या अनभिज्ञाच्या) रसास्वादाला नवे आयाम मिळतील हे नक्कीच.
पुन्हा धन्यवाद आणि लेखमालेसाठी शुभेच्छा.
आपला,
---- लिखाळ.