कुशाग्र - संतांचे मराठी आजच्या काळातील मराठी माणसाला संस्कृतप्रचुर किंवा खरेतर थोडेसे कठीण वाटते या अर्थाने आपले म्हणणे मला पटते.
कुशाग्र यांचा प्रश्न खरेतर थोडा वेगळाच आहे असे मला वाटते. माझी भूमिका ही अशी -
सर्वच संत हे बहुजनसमाजाचेच होते. ज्ञानेश्वरांना बहुजनसमाजाचे नाही म्हणणार तर इतर कोणासही बहुजनसमाजाचे म्हणता येणार नाही. बहुजनसमाज याचा अर्थ धर्म/सत्ता मुठीत ठेवणाऱ्यांपलिकडील सर्वजण असाच तर आहे ना? त्या अर्थाने ज्ञानेश्वरांसह बहुतेक सर्वच संतांनी जनसामान्यांच्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केलेला असावा. तसे दावे तरी त्यांनी आपल्या लिखाणांत वेळोवेळी केल्याचे दाखले दिसून येतात.
त्यामुळे कदाचित कुशाग्र यांचा प्रश्न प्रथम संतकालीन जनसामान्य मराठी हे संस्कृतप्रचुर किंवा संतवाणीप्रमाणे होते काय असा पाहावा लागेल असे वाटते.
कुशाग्र यांनी दिलेलेच शिवकालीन संदर्भ देण्याचे मनात होते.
तसेच मराठी ही कमी दर्जाची मानून संतांनी ती संस्कृतप्रचुर केलेली असावी हे निदान टिकेल असे वाटत नाही.
भाषाप्रभूंनी यावर मत व्यक्त केल्यास बरे होईल.