यातील शब्द अवघड आहेत हे कोणीही मान्य करेल अगदी आजही लोनीपानी करणारे सुशिक्षित लोक (यात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही)दिसतात असे असताना इतकी शुद्ध भाषा त्यांच्या अभंगात कशी आढळते हे कोडेच आहे.
आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाशी सहमत.
संतचारीत्र्यावर आधारीत सर्व चित्रपटांत त्याकाळची बोली भाषा ही आजच्या गावरान बोलीपेक्षा फार वेगळी वाटत नाही. अर्थात चित्रपटांवरून इतिहास शिकू नये हेही तितकेच खरे आणि सर्व चित्रपट ऐतिहासिक दृष्टया योग्य असतात असेही नाही. पण या चर्चेच्या अनुषंगाने हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले.