जयश्री,
शब्दरचनेच्या दृष्टीने कविता आवडली!पण या प्रतिसादाच्या शीर्षकात सूचीत केल्याप्रमाणे सध्या 'जीवन म्हणजे अमुक आहे,तमुक आहे' असे सांगणाऱ्या व शेवटी 'आपलं आपण ठरवावं' असा (संदिग्ध) उपदेशपर शेवट असलेल्या कविता मराठीत खूप वाचायला मिळतात. अशा कवितात कविच्या गुणवत्त्तेनुसार रचनाकौशल्याची विविधता व सौंदर्य (उदाः ही कविता) असले तरी सुस्पष्ट आशयाचा अभाव जाणवतो.त्यामुळे अशा कविता एकाच प्रश्नाची पुनःपुनः निरनिराळ्या शब्दात मांडणी करत असतात.(दे रीडीफाईन द प्रॉब्लेम!) तसेच कविता वाचल्यावर हे कवीचे आत्मचिंतन (लाउड थिंकीग) की 'कसे जगावे' या बद्दलचा अनुभवसिद्ध संदेश आहे ? अथवा कविची नेमकी भूमिका काय? हा संभ्रम राह्तोच.
प्रामाणिक मत . राग नसावा.
जयन्ता५२