हिटलर ज्या परिस्थितीत घडला ती पाहता त्याचे वर्तन अपेक्षित असेच म्हणता येईल. अर्थात,जागा आणि वेळ यांचा विचार करता त्याची पार्श्वभूमी सविस्तर सांगता येत नाही. मात्र पहिल्या महायुद्धाची युरोपातील पार्श्वभूमीच हिटलरच्या उदयाला कारण ठरते.त्याच्या काळात त्याच्या देशाची प्रगती घडून आली,हे पाहता तो योग्य प्रशासक होता असे म्हणू या. मात्र त्याने हिंसकवृत्तीचा जो अतिरेक केला,तो मात्र आपल्या (अपेक्षित भारतीय) हिटलरने टाळला पाहिजे. एरवी १९७७ च्या आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजनाच्या जबरदस्तीने तसा हिटलरीपणाच दाखवला होता.अर्थात, भारतीयांची मानसिकता जरी पूर्वीच्या राजे-महाराजांच्या वंशजांना मान देण्याची असली तरी हिटलरची अपेक्षा भारतीय माणूस करणार नाही.हिटलर काहीसा चुकला, पण  जो माणूस मरताना आपल्या प्रेयसीला जवळ घेऊन आत्महत्या करतो,त्याला निर्दयी वा भावनाशून्य कसे म्हणायचे?

अवधूत.