आपण संतांच्या अ-संस्कृत भाषकत्वाविषयी भाष्य केले आहे. तुकारामांसारख्या संतांनी तर संस्कृत साहित्याचा आधार घेतला असावा असे मला वाटते. "मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास...." हा अभंग "वज्रादपि कठोरानि मृदुनि कुसुमादपि " या संस्कृत श्लोकाच्या जवळचा वाटतो. या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे या संतांना (भले मंदिरप्रवेश नसेल पण मंदिराबाहेरून) कीर्तन, पुराण ऐकायची संधी समाजाने नाकारली नव्हती, हे असेल. दुसरे असे की ब्राह्मणेतर असूनही धार्मिकता जपत असलेल्या जैन, महानुभव या वर्गानेही ही संस्कृत-प्रचुरता वाढवण्यात मदत केली असावी. तसेच काही ब्राह्मण संतांनीही (उदा.ज्ञानेश्वर , एकनाथ,इ.इ.)या संतांना संस्कृत साहित्याची माहिती दिलेली असू शकते. मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो. की संस्कृत ही नागरभाषा होती याचाच अर्थ ती केव्हा ना केव्हा बोली भाषा असलीच पाहिजे. पैशाची, प्राकृत वगैरे भाषा त्याशिवाय तिच्यापासून निर्माण होणे शक्य नाही. या अन्य भाषा ब्राह्मणेतरांनी जास्त वापरल्या पण त्यांचे मूळ संस्कृत आहे.आणि त्यामुळेही या संतांच्या लेखनात संस्कृतचा गंध जाणवत असेल.आपण ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली गेली असे मानतो, पण प्रत्यक्षात ती प्राकृत बोली आहे. एकूणच संस्कृत अप्रत्यक्षपणे अन्य संतांनीही अनुभवलेली भाषा वाटते. 

चर्चेसाठी सुंदर विषय निवडला आहे.  अभिनंदन.

 अवधूत.