भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.. (क.नारायण सुर्वे)

हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहीले!

कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहीले!!

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो..

दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो!!

सकाळ

आली लाजत आज सकाळ

किरणांचे भुरभुरते कुंतल

निळसर शुभ्र धुक्याचा आंचल

दुनिया गमली अलका स्वप्निल

मुक्त हासले क्षणभर आणिक

जीवन हे खडकाळ

आली लाजत आज सकाळ