"प्रखर राष्ट्रभक्ती, कणखर नेतृत्व, अप्रतिम नेतृत्त्व गुण, असामान्य जनप्रेरणा, ऊत्कृष्ट नियेजन-दूरदृष्टी, लाभ रहीत सत्ता हे हिटलरचे गुण वाखाणावे लागतील."

हे सर्व खरेच असेलही, पण असे गुण असून त्याने जर्मनीला शरमेने मान खाली घालायला लावली हेही तितकेच खरे आहे.  - सुहासिनी

जर्मनीची मान तेव्हा शरमेने खाली गेली जेव्हा वर्साय तहावर स्वाक्षऱ्या झाल्या. जेव्हा त्यांची सेना खच्ची झाली आणि राष्ट्रध्वज उतरला. आणि त्याच राखेतून जन्म घेत वर झेपावला तो हिटलर. कारण तो त्याच्या मातृभूमीचा अपमान सहन  करण्या इतका सहिष्णू नव्हता. हिटलर आयुष्यात फ़क्त दोनदाच रडला. एकदा त्याची आइ गेली तेव्हा आणि दुसऱ्यांदा वर्साय चा तह झाला तेव्हा.

हिटलर सत्तेवर आला तेव्हा जर्मनीची सामाजीक, आर्थिक व राजकिय परीस्थिती काय होती, बेकारी व मंदी किती भयानक होती, डॉलरः डॉइश मार्क हा विनिमय दर किती होता हे एकदा वाचा.

गुलाम जर्मनीने लढाउ जहाजे बांधायची नाहीत हे बंधन असताना बिस्मार्क, ग्राप्फ़ स्पी उभ्या राहील्या त्या हिटलरमुळे. याला म्हणतात कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी

जर्मनीचे सैन्य पोलंडमध्ये गुंतले होते, पश्चिम सीमेवर अवघे पांच डिव्हीजन सैन्य होते आणि तरीही दोस्तांचे ३४ डिव्हीजन सैन्य हात चोळत बसले ते हिटलर मुळेच. याला म्हणतात अचूक व्युहरचना आणि दरारा.

आपल्या मॅजिनो तटबंदीची बढाइ मारणारा फ्रान्स पँझरच्या डुक्कर मुसंडीने हादरला. सगळी तटबंदी तशीच ठेवून रोमेलचे रणगाडे आर्देन्सच्या जंगलातून थेट सेदाँ वर धडकले व त्यांनी तटबंदीच्या आत शिरून उलट मारा तटबंदीवर सुरू केला, फ्रेंचांना प्रत्युत्तरही देता येईना. याला म्हणतात अभ्यास आणि नवनिर्मीती. हे सगळे शक्य झाले ते हिटलरने रोमेलवर सोपवलेल्या विश्वस्त जबाबदारीने. याला म्हणतात माणसे घडवणे.

आपल्या राष्ट्रध्वजाला खांद्यावर घेउन हसत मरायला लाखो तरूण खुशीने तयार झाले, त्यांचे इप्सीत एकच होते - आपल्या मातृभूमीच्या अपमानाचा बदला. हे स्फुल्लींग कुणी पेटवले? केवळ हिटलरने. याला म्हणतात प्रेरक.

जर्मनीला मान खाली घालावी लागली ती त्या देशात झालेल्या मानवी संहारामुळे (नैतिक) आणि पराभवामुळे (भौतिक) हिटलरच्या वरील गुणांमुळे नाही! तुम्हाला आवडत नसला तरी त्याचे गुण नाकारणे शक्य नाही. (हिंदुस्थानला १५० वर्षे गुलाम बनवून आणि तिथल्या जनतेवर अनन्वीत अत्याचार करूनही इंग्लंड आज मान वर करून जगतेच आहे ना?).