या चर्चेत देशाने तुम्हाला खूप काही दिले आता तुम्ही परतफेड करा असा सुर दिसतो... पण खरंच देशानं मला काही दिलं का?
आता वर एका ठिकाणी देशाने वीज, पाणी, रस्ते, शिक्षण इ. दिल्याचं सांगण्यात आलं. बरं तर... दिलं देशाने वीज, पाणी, रस्ते, शिक्षण इ.
कुठून दिलं? द्यायला पैसे कुठून आले? १०० कोटींच्या देशातल्या जेमतेम एखाद्या कोटींनी भरलेल्या करांमधून... माझ्या नोकरदार वडिलासारख्या एखाद्या कोटींनी भरलेल्या करांतून उरलेल्या ९९ कोटींना चक्क फुक्कट वीज, पाणी, रस्ते, शिक्षण इ. दिलं त्या देशोबानी... थोडक्यात आम्ही देशाला १०० रु. दिले आणि त्याने आम्हाला १ रु. चे वीज, पाणी, रस्ते, शिक्षण इ. दिले...
त्यामुळे तसं पाहायला गेलं तर तो भामटा देशच आमच्या सारख्या करदात्यांचं देणं लागतो... तेंव्हा आता देशाने आमच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा आमचीच निदान सहा मुलं तरी दत्तक घ्यावी...