काय एक एक गुणगान चाललेलं आहे!
अहो दोषांकडे डोळेझाक करून नुसते गुणच लिहायचे असे ठरवले ना तर कोणाचेही गुण लिहिता येतात. उद्या कोणी उठून हिटलरचेसुद्धा गुण लिहून दाखवेल! अरे बापरे, उद्या कशाला, तुम्ही ते आजच केलेत की.
अर्धवट व एककल्ली वाचन, एकूणच असहिष्णुतेची आवड, आणि जोवर आपल्याला काही त्रास होत नाही तोवर सगळे जग नष्ट झाले तरी चालेल अशी मानसिकता या गोष्टी मला या चर्चेत सतत दिसत आहेत (प्रतिसादाचा हा भाग एकट्या तुम्हाला नाही, या चर्चेतील हिटलरच्या सर्व भाटांना आहे)
आता आपल्या काही मुद्द्यांचा परामर्शः
हिटलर आयुष्यात फक्त दोनदाच रडला. एकदा त्याची आइ गेली तेव्हा आणि दुसऱ्यांदा वर्साय चा तह झाला तेव्हा.म्हणून तो श्रेष्ठ?? मी त्याला निष्ठुर म्हणेन फार तर. इथे माझे डोळे रस्त्यावर मेलेलं मांजर बघितलं तरी थोडे पाणावतात. न रडणं हा गुण कसा ते काही समजले नाही बुवा.
हिटलर सत्तेवर आला तेव्हा जर्मनीची सामाजीक, आर्थिक व राजकिय परीस्थिती काय होती, बेकारी व मंदी किती भयानक होती, डॉलरः डॉइश मार्क हा विनिमय दर किती होता हे एकदा वाचा.
गुलाम जर्मनीने लढाउ जहाजे बांधायची नाहीत हे बंधन असताना बिस्मार्क, ग्राप्फ़ स्पी उभ्या राहील्या त्या हिटलरमुळे. याला म्हणतात कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी
जर्मनीचे सैन्य पोलंडमध्ये गुंतले होते, ... याला म्हणतात अचूक व्युहरचना आणि दरारा.
.... हे सगळे शक्य झाले ते हिटलरने रोमेलवर सोपवलेल्या विश्वस्त जबाबदारीने. याला म्हणतात माणसे घडवणे.
आपल्या राष्ट्रध्वजाला खांद्यावर घेउन हसत मरायला लाखो तरूण खुशीने तयार झाले
जर्मनीला मान खाली घालावी लागली ती त्या देशात झालेल्या मानवी संहारामुळे (नैतिक)
आणि पराभवामुळे