सुभाष,

वरील आवाहनासाठी धन्यवाद,

माहिती मिळाली तर उत्तमच. काही कविता गूढ अर्थाच्या असतात. काही मनोगतींनी  माझ्या लिखाणावर  टीका केली आहे. करावी. त्यांचे म्हणणे असे की एखाद्या कवीच्या नावावर तुमची मते का लादता?

मला या बाबतीत शालेय अभ्यासातील संदर्भासहित स्पष्टीकरण हा लेखन प्रकार आठवतो.  त्यात कवितेतील एखादी ओळ देऊन त्याचे स्पष्टीकरण विचारलेले असायचे. विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीनुसार कवीला काय सांगायचे आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत. या प्रश्नाचे बीजगणितासारखे २+२ = ४ असे साचेबंद उत्तर अपेक्षित नसायचे. नाहीतर सर्वांचेच उत्तर सारखे आले असते. (गाईडच्या  वापरामुळे ते तसे येते हा भाग वेगळा)

इथे मला हेच अभिप्रेत आहे की सहज अर्थ निघत नसेल तर नेमका अर्थ काय आहे यासाठी मनोगत वर विचारावे. म्हणूनच सुभाष यांचा प्रश्न स्वागतार्ह आहे.