इहलोकी महाशय,
आपली टीका फारच हास्यास्पद आहे.
<<अर्धवट व एककल्ली वाचन, एकूणच असहिष्णुतेची आवड>> ही टीका वैयक्तिक स्वरुपाची असल्याने दखल घेण्याच्या लायकीची नाही.
<<
हिटलर आयुष्यात फक्त दोनदाच रडला. एकदा त्याची आइ गेली तेव्हा आणि दुसऱ्यांदा वर्साय चा तह झाला तेव्हा.
म्हणून तो श्रेष्ठ?? मी त्याला निष्ठुर म्हणेन फार तर. इथे माझे डोळे रस्त्यावर मेलेलं मांजर बघितलं तरी थोडे पाणावतात. न रडणं हा गुण कसा ते काही समजले नाही बुवा.>>
तुम्ही कधी आणि का रडावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, इथे कशाला सांगता. ते विषयाशी संबंधित नाही. मुळात एकतर आपल्याला माज्या विधानाचा अर्थ समजला नाही किंवा समजूनही आपण काणाडोळा करून भलतेच फाटे फोडीत आहात.
<आणि त्या बुडल्याही त्याच्याचमुळे!> हे हे हे! त्याने कथेत असतात तशा अक्षय नौका निर्माण केल्याचा दावा मी केलेला नाही हो, जरा नीट वाचा. नौका बुडाल्या त्या युद्धात. आधी निर्माण झाल्या त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत. त्याचा कर्ता करविता हिटलर होता.
<<नाही हो, त्याचे कारण वेगळे होते. हा आश्चर्याच्या धक्क्याचा फायदा होता. दोस्तांची तयारीच नव्हती अजून लढण्याची.>> हे हे हे. रडीचे खेळाडू बाद झाले की मनगटावर थुंकी लावून टाइम प्लिज मागतात त्याची आठवण झाली. असो. यालाच हिटलरचे धक्कातंत्र असे म्हणतात. ज्याची तयारी नाही त्याने युद्धात उतरू नये. आणि, तयारी मनाची असावी लागते. शेंदाडांच्या मोठ्या फौजा कधी युद्ध जिंकत नसतात.
<त्याच रोमेलने हिटलरला मारण्याच्या कटात भाग घेतला. त्याच रोमेलचा शेवट कसा झाला हे आपल्याला माहीत असेलच.< म्हणून हिटलरने रोमेल ला घडवला हे नाकारता येत नाही. महाशय, चर्चा करताना, टीका करताना लिहून टाकायची घाई न करता, एखाद्याला हाणुन पाडायच्या आवेशात स्वतःचे हसे करुन न घेता समस्त लेखन नीट वाचत जा. माझा पहिला प्रतिसाद जो सचिनच्या सदभावनेमुळे इथे येउ शकला तो नीट वाचा.
<<ते सगळ्याच देशांचे झाले हो. इंग्लंडमध्ये हिटलर नव्हता तिथलेही झाले, अमेरिकेत नव्हता तिथलेही झाले, फार दूर कशाला, भारतातलेही झाले. उगीच कसलेही श्रेय कोणालाही द्यायचे म्हणजे काय?>> म्हणजे जर्मनीत झाले आणि ते हिटलरमुळे झाले हे खोटे ठरत नाही. प्रत्येक आई-वडील आपापल्या मुलांना लहानाचे मोठे करतातच. तरीही सगळी मुले आपापल्या आई-वडीलांचे ऋण आजन्म मानतात. सगळेच ते करतात तुम्ही काय मोठे दिवे लावलेत? अशी संभावना करीत नाहित. अर्थात या माझ्या आणि मला परिचित असलेल्या अनेकांच्या भावना.
कितीही नाकारलेत तरी त्याचे असामान्य कर्तृत्व कमी होत नाही. जे वाईट आहे ते वाईटच आहे. पण त्यामुळे जे चांगले आहे तेही अमान्य करणे याला वैचारिकता न म्हणता द्वेष म्हणतात. हिटलरने ज्यूंचा द्वेष केला, तुम्ही त्याचा करताय.