महाशय,

तुमची बहुतांश विधाने अगदी खरी आहेत. पण त्यांना वास्तवाची कितपत जोड आहे हे समजण्यासाठी मी काही काल्पनिक प्रश्न विचारतो. उत्तर द्याल?

१. मूलभुत सोयीसुविधांसाठी जर तुम्हाला अपेक्षित असलेल्या हिटलरच्या सरकारने तुमच्याच राहत्या घराचा ताबा घ्यायचा ठरवला, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

२. लोकसंख्या कमी करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित असलेल्या हिटलरच्या सरकारने काही निकष ठरवले व त्या निकषात न बसणाऱ्यांची सर्रास कत्तल करण्याचे आदेश दिले. तुम्ही जर त्या निकषात बसत नसाल आणि तुमचीही कत्तल होणार असेल तर तुमचे भावविश्व कसे असेल? तुमची प्रतिक्रिया काय असेल?

३. राष्ट्राची आर्थिक पायाभरणी करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित असलेल्या हिटलरच्या सरकारने तुमच्या आर्थिक उत्पन्नावर सत्तर टक्क्यांइतका कर बसवला व जेमतेम महिन्याच्या घरखर्चाइतके पैसे तुमच्या खिशात ठेवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

माफ करा मला हिटलरला माथेफिरू ठरवायचे नाहीये. पण तुम्ही त्याला जे समर्थन देताय त्यामागची वस्तुनिष्ठता जाणून घ्यायची आहे.

कलोअ.