माझा "बिलंदरपणा" काय ते मला अजून कळाले नाही. असो.
हिटलरने केलेली कत्तल ही "आर्यवंशच श्रेष्ट" या समजावर आधारलेली होती. त्यात मानसिक असंतुलनाचाही भाग होता. त्यामुळे हा भाग त्याच्यापासून वेगळा करणे अशक्य आहे. आणि धडाडी,महत्वाकांक्षा हवी असेल तर अजून बरेच नेते आहेत. शिवाजीमहाराज, टिळक, सम्राट अशोक, नेपोलियन...

आत्तापर्यंतच्या चर्चेवरून असे दिसते की हिटलरला हिरो मानणाऱ्या लोक त्याच्या महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती वगैरेने भारावून गेले आहेत. प्रत्येक माणसामधे चांगले आणि वाइट गुण असतात. प्रश्न असा आहे की तुम्ही एखाद्याला "हिरो" कधी म्हणता? औरंगजेबही शूर, लढवय्या, कट्टर धर्माभिमानी होता. पण आपण शिवाजीमहाराजांनाच वंदन करतो. का? कारण या सर्व गुणांबरोबर ते विवेकी होते. जाणता राजा होते.
जर कुणाला हिटलरच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्याला हिरो ठरवायचे असेल तर ठरवा. शेवटी  हे तुम्ही कुठल्या गुणांना महत्व देता त्यावर अवलंबून आहे. माझ्या मते माणुसकी हा गुण सर्वात वर येतो.
आजही माझे जर्मन मित्र या विषयावर बोलायला कचरतात. एकाच्या मते आजच्या जर्मन युवकांमधे देशप्रेम नावाची भावनाच उरलेली नाही. आपल्या देशात झालेल्या अमानुष
ह्त्याकांडानंतर शरम, पश्चाताप ह्याच भावना उरल्या आहेत. ही जखम लवकर भरून येणारी नाही.