संपूर्ण सहमत!

जेते लोकच इतिहास लिहित असल्यामुळे हिटलरच्या बद्दल इतर जगात ते विद्वेष पसरवू शकले. इंग्रज, फ्रेंच, मोगल, तुर्की, चीनी, जपानी यांनी देखिल इतरांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. अमानवी छळ केला आहे. लाखो सामान्य नागरीकांना देशोधडीला लावले आहे. जगाच्या रक्षणाचा आव आणणारी अमेरिकादेखिल प्रत्यक्षात निरपराध लोकांना ठार मारत आहे. लोकशाहीच्या नावाखाली प्रत्यक्षात दडपशाही चालू आहे. दहशतीने एकछत्री अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेने अनेक देशांवर अनैतिकरित्या आक्रमण केले आहे. अमेरिकेच्या भविष्यातील योजना केवळ भयानक अशा आहेत!.

फक्त हे सर्व जेते असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. आणि केलेच तर तो आवाज दडपण्याचे सर्व उपाय ते करतात.

त्यामुळे या सर्व साम्राज्यवादी व युद्धपिपासू लोकांपासून हिटलरला वेगळे काढण्याची गरज नाही. फरक इतकाच म्हणावा लागेल की राष्ट्र उभारणीमधे हिटलरचा प्रचंड मोठा वाटा होता. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याने अक्षरशः राखेतून पुन्हा जर्मनी उभा केला. आणि देशाच्या अपमानाचा बदला घेणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते. त्यामुळे त्यात मुख्यत्वे देशभक्ती होती. इतर राज्यकर्त्यांकडे मात्र केवळ सत्त्ताकांक्षा आणि हुकुमशाही प्रवृत्त्ती होती.