मला आनंद वाटतो की मी मला काय वाटते ते बऱ्याच मनोगतींच्या गळी उतरवू शकलो आणि माझ्याशी बरेच लोक सहमतही झाले.बहिणाबाई कवियित्री होत्या पण संत नव्हत्या असे मान्य केले तरी त्यानी बोलीभाषेत अभंग लिहिले हे तरी मान्य करणे आवश्यकच होते आणि माझा मुख्य मुद्दा तोच होता‌. श्री.पु.भागवत यानीही त्यांच्याकडे येणाऱ्या हस्तलिखितात शुद्धलेखनाच्या अनेक चुका असतात असे म्हटले आहे त्या दुरुस्त करूनच लेखन प्रकाशित करतात‌. मग संतांच्या अभंगांचे असे शुद्धिकरण आणि पुनर्लेखन कोणी केले की काय अशी शंका येते.