"जगाची राजधानी" हे शीर्षक फारच खटकले. एका देशाच्या राजधानीला "जगाची" राजधानी म्हणणे योग्य नाही.

सर्वप्रथम "एका देशाच्या राजधानीला"बद्दल: न्यूयॉर्क (शहर) ही अमेरिकेची राजधानी नाही. (अवांतर: किंबहुना ती न्यूयॉर्क राज्याचीही राजधानी नाही.)

दुसरे, "जगाच्या राजधानी"बद्दल: न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) मुख्यालय असल्याने बऱ्याचदा न्यूयॉर्कचा उल्लेख "जगाची राजधानी" असा केलेला ऐकलेला आहे. (अवांतर: अर्थात सं.रा. हे खऱ्या अर्थाने "जागतिक शासन" (World Government) नसल्याने तोही उल्लेख खरे तर चुकीचा आहे, असे माझे आपले एक मत आहे.)

- टग्या.