मला आवर्जून प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मनोगतींचे मनापासून आभार. भोमेकाका, राधिका, अनु, द्वारकानाथ, सन्जोप राव,लिखाळ , कारकूनव, टगेराव, विनायक काका, वात्रट तात्या, संवादिनी,प्रसाद , मृदुला , मानसी ,रोहिणीकाकू , चक्रपाणि तुमची सर्वांची मी मनापासून आभारी आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कौतुकाचे माझ्यासाठी शब्द अमोल आहेत.
या अनुवादात निःसंशयपणे झालेल्या चुका माझ्या लक्षात आणून देणारे टगेराव आणि मृदुला सारखे उत्तम आणि सकारात्मक टीकाकार मनोगतावर आहेत याचा मला अभिमान आहे. त्या दोघांची मी ऋणी आहे. या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी मी घेईन.
तात्या... तुला अनुवाद 'ठीक' वाटला हे ऐकून आनंद झाला.
आणि जाता जाता टोपणनावाबद्दल थोडेसे.. मला असं वाटतं की जोपर्यंत मी माझ्या कवितेखाली - लेखाखाली - प्रतिसादाखाली अदिती अशीच स्वाक्षरी करते तोपर्यंत माझे टोपणनाव काहीही असले तरीही काही फरक पडणार नाही. नाही का ! नावे पाहून मग लेखन वाचण्याच्या तथाकथित कंपूबाजी प्रकाराला यामुळे कदाचित पायबंद बसेल (ही आपली एक भाबडी आशा आहे... हलकेच घेतलीत तरी वाईट वाटणार नाही) ... एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढताना आपण इथे असलेला जुना जिव्हाळा गमावून बसलो आहोत याची खंत मात्र निश्चित वाटते.
आणि शेवटी कथेबद्दल थोडेसे... मला ही कथा विशेष आवडली कारण या कथेत शेरलॉक होम्स ला तसं पाहिलं तर पराभव पत्करावा लागला. तोही त्याने किती वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने स्वीकारला हे पाहून मला त्याच्याबद्दल आदर वाटला. प्रत्येक गोष्टीत यश मिळालेच पाहिजे अशी मनोभूमिका घेऊन वावरणाऱ्या आजच्या जगात ही गोष्ट जरा वेगळी वाटली. त्याहूनही उल्लेखनीय मुद्दा म्हणजे होम्सला प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण करायला मिळालेल्या अत्यंत थोड्या वेळातही त्याने केलेला अचूक अंदाज, त्याची स्थिर अशी बुद्धी आणि चट्कन निर्णय घेण्याची त्याची क्षमता आणि ओपनशॉच्या कथेतले विलक्षण पकड घेणारे वातावरण. हे सगळं वाचताना या कथेने मला इतकं झपाटून टाकलं होतं की ती वाचून पूर्ण होईपर्यंत मी पापणी सुद्धा हलवायची विसरून गेले होते. इतकं खिळवून ठेवणारं वर्णन वाचल्यानंतर या कथेचा शेवट जरा फुसका असू/ वाटू शकतो असा विचार माझ्या डोक्यातही आला नाही. कॅलक्युलेटेड शेवट आणि तात्पर्ये यांची अपेक्षा ठेवणाऱ्या मनाला असा छेदही बसायला हरकत नाही असं माझं मत आहे.
--अदिती