आधी आम्ही एखाद्या धर्माच्या असहिष्णुतेबद्दल कोकलतो, दुसऱ्या धर्माच्या असहिष्णुतेबद्दल बोंबलतो. मग आमच्या प्रदेशावर, भाषेवर किती न्याय होतो आहे ह्याची आपल्याला मनस्वी चीड येते. त्यानंतर मग आम्ही एखादी जात कशी वरचढ होते आहे, यावर काथ्याकूट करतो आणि आमच्या जातीवर किती अन्याय होतो आहे यावर फालतू चर्चा करतो. मग पोटजातीवर येतो. बावने-सोमोस, चित्पावन-देशस्थ, ९६कुली-कुणबी ह्या भेदांवर बकत बसतो. ह्या गोष्टींना काही अर्थ नाही.

असो.

वरील चर्चेत हिंदू समाज भयगंडग्रस्त कसा आहे हे कळत नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भडकलेल्या प्रत्येक दंगलींतील हिंदू आणि मुसलमान बळींचा 'स्कोअर' बघितला, तर हिंदूनी प्रत्येक वन-डे सामना जिंकला आहे. कारण साफ आहे व्यवस्था, तंत्र, निमलष्कर हे हिंदूंच्या बाजूने असते. भिवंडीचे उदाहरण घ्या, भागलपूरचे उदाहरण घ्या.

दंगलखोरांसाठी प्रत्येक दंगा एक वन-डे मॅच असते. त्यांनी आमचे १० मारले. आता आम्हाला ११ वर स्कोअर न्यावा लागणार ह्या कर्तव्यभावनेतून बरेच निष्पाप हातठेलेवाले, मजूर, बायापोरे मरतात.

बहुसंख्य हिंदूंसाठी आणि बहुसंख्य मुसलमानांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नाही. ते बिचारे रोजंदारीवर काम करतात, मेहनतमजुरी करतात. त्यांना ह्या मुद्द्याकडे द्यायला वेळही नाही.

अश्या वांझोट्या चर्चा आमच्यासारख्या खुर्चीवर बसून सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून ठीक असतात. त्यातून हशील काही होत नाही.

 

चित्तरंजन