दिगम्भा,
सुरुवात छान झाली आहे. पेटी किंवा वाजवायचा की बोर्ड असल्यास ते समजायला जास्त उत्तम होईल. तरी उत्साही लोकांनी याचा जरूर विचार करावा. भोमेकाकांनी की बोर्डची दिलेली चित्रे हा विचार समजावून घेण्यास उपयुक्त ठरेल.
ह्या दुव्यावर पेटीची छान माहिती दिली आहे ती पण जरूर वाचा. चंद्रकांता आणि कोर्टनी या ह्यूस्टन स्थायिक दांपत्याचे हे ठिकाण आहे. त्यावर इतरहि चांगली माहिती मिळेल.
सुपरिचित Sound of Music तसेच त्यावर आधारित परिचय या हिंदी चित्रपटांत संगिताच्या मूळाक्षरांची ओळख गाण्याद्वारे केली आहे. ती गाणी "Doe a deer female deer" आणि "सारे के सारे गमोको लेकर गाते चलो" आहेत.
हे प्राथमिक सा रे ग म प ध नि सा स्वर शुद्ध समजले जातात. स्वरांमधले अंतर आणि कोमल स्वर (आणि तीव्र मध्यम) याची ओळख दिगम्भा करून देतीलच.
एक सावधानतेची सूचना- "सरगम" या चित्रपटातले गाणे
"जब दिलको सताये गम छेड सखि सरगम" या गाण्यत असलेले सारेगमपधनिसा हे शुद्ध स्वर नसून ग आणि नि हे कोमल आहेत, त्यामुळे ते काफी रागात आहेत.
हा प्रतिसाद लिहिल्यानंतर श्री. दिगम्भा यांनी माझ्या लक्षात आणून दिले कि सरगम मधील त्या गाण्यातले ग आणि नि याबरोबर ध(धैवत) हा सुद्धा कोमल आहे. त्यामुळे तो काफी राग नसून आसावरी राग आहे. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी प्रतिसादात बदल केला आहे. ही माझी चूक अनवधानाने झाली होती.
(बदल १३ जूनला केला)
कलोअ,
सुभाष