मी ही आज "सारेगम" केला .
सुदैवाने शेजारच्याच्या रूम मध्ये हार्मोनियम आहे :)
मला आलेल्या अडचणी-
वाजवायला सोपे आहे म्हणायला अवघड जाते आहे. म्हणजे सा नंतर रे नंतर ग असे ओळीने म्हणता येते पण सा नंतर एकदम ग किंवा म म्हणता येत नाहीये.
तसेच 'सा' म्हणताना सर्वात खालचा सूर काढला जातो त्यामुळे सा च्या मागच्या सप्तकात जाता येत नाही.
सूर कळण्यासाठी सारेगमपधनिसा किंवा वरील तात्यांनी दिलेले, तत्सम गाणे वाद्याची साथ नसताना म्हणता येणे आवश्यक आहे का? (म्हणजे तसाही सराव करता येईल)
म्हणणे आवश्यक असल्यास सरावाने आवाज आपोआप मोकळा होतो का? (आत्ता तसा नाहीये)
अर्थात या अगदीच सुरवातीच्या अडचणी आहेत. यावर तुम्ही हसाल. आणि 'सराव करणे' हाच सल्ला द्याल याची खात्री आहे, पण जे वाटले ते लिहिले इतकेच.
धन्यवाद.