श्री. प्रवासी,

मुक्त केले सावलीने, दु:खही सोडून गेले 

नाती-गोती, मित्र परिवार इत्यादींना कितीही आपले म्हंटले तरीही शेवटी ते 'परके'च असतात. त्यांची आपल्याला १०० टक्के साथ कधीच नसते. सावलीचे तसे नसते. सुखात, दु:खात, आनंदात, संकटांत ती सदैव आपल्याला निस्वार्थ बुद्धीने साथ देत असते. तीच्यावर आपला 'आपलेपणाचा' हक्क असतो. पण अशी आपली आत्यंतीक 'हक्काची' सावलीही आपली साथ सोडते, आपल्याला 'मुक्त' करते, हे दु:ख पराकोटीचे आहे. त्याच प्रमाणे, 'सुखाला' सगळेच 'आपलं' मानतात. कारण ती आनंददायी भावना असते. दु:खाला कोणी आपलं मानत नाही. ती एक क्लेशकारी भावना आहे. अशा दु:खालाही कोणीतरी जवळ करणारं हवं असतं. (ही कवी कल्पना आहे) पण त्यालाही (दु:खाला) मी आपलं म्हंटलेलं नको आहे. तेही माझी कदर न करता मला सोडून जात आहे ह्याहून वाईट ते काय? याहून मोठं 'एकाकीपण' नाही. (ज्याच्या जवळ स्वत:चं असं 'दु:ख'ही नाही.)   

हात ना ज्यांचा कधी आधार घेण्या मज मिळाला
चार खांद्यांवर मला मेल्यावरी घेऊन गेले

काही वेळा मनुष्याच्या उर्मटपणामुळे, तक्रारी वृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून दूर राहतात. परंतु एकदा माणूस मेला की तो ब्रह्मतत्त्वात विलीन होतो असे म्हणतात. त्यामुळे मेलेल्या माणसाविषयी चांगले बोलावे असे म्हणतात. आणि खांदा द्यायला जाणे हा तर शेजारधर्मच आहे तेव्हा ते चांगलेच आहे.

प्रवासी, तुमचा विचार योग्यच आहे. परंतु, हा एक सामाजिक व्यवहार झाला. कवीच्या भावना वेगळ्या आहेत. 'जीवंतपणी' जेंव्हा आधाराची गरज होती तेंव्हा ज्यांनी कधी आधार दिला नाही, ज्यांना त्याचे महत्त्वच जाणवले नाही त्यांनी, मी 'मेल्यावर' म्हणजे, आधाराची कांही गरज उरली नसताना, कांही उपयोग नसताना, नुसत्या एकानेच नाही तर अगदी चौघा-चौघांनी खांद्यावर घेतले. इथे 'खांद्यावर घेणे' हे 'आधार देणे' या अर्थी योजीले आहे.   

श्री. मिलींद,

'मी एकाकी....' हे नांव कसं वाटतं?