निरुभाऊ
मी हिटलरशाही हा शब्द अश्यासाठी वापरला की त्यामुळे जरा फरक स्पष्ट करता यावा. तेथील जनतेने त्याला निवडले पण त्याला बाजूला करु शकली नाही. खऱ्या लोकशाहीत सत्ता एका माणसाच्या हाती एकवटलेली नसते. हिटलरकालीन जर्मनीत कश्या प्रकारची लोकशाही अस्तित्वात होती याचा माझा अभ्यास नाही. बऱ्याच वेळा असे आपण संदर्भ देतो ते कोणत्या पुस्तकातून दिले आहेत हे सांगितल्यास बरे होईल. मलाही या विषयावर लिहीलेले काही आढळले तर इथे लिहीन. पण, जर सगळे सत्तेचे केन्द्रबिंदू जर एका कंपूच्या हाती असतील आणि त्याला बाजूला करण्याचे अधिकार वा विचारशक्ती लोकांत उरली नसेल, तर अशी जी अनिर्बंध सत्ता आहे तिला मी हिटलरशाही म्ह्टलं. अशी सत्ता निर्माण होण्यात त्या त्या वेळच्या सामान्य लोकांचा त्यात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभाग असतोच, आणि ते माझ्या आधीच्या लिखाणात थोडंसं आलंही आहे. माझं म्हणणं असं आहे की भलत्या लोकांचे (जे आपल्या देशातलेही नाहीत - भारताबद्दल ज्यांची मते काय होती ते आपल्याला माहितीही नसताना -) समर्थन करत रहाण्यापेक्षा आपण जमेल तेवढे चांगले प्रशासन आणण्याचा, चांगल्या लोकांना उत्तेजन देण्याचा "खारीचा वाटा" का उचलू नये?
सुहासिनी