मला स्वतःला अडवाणींचे जीनाविधान आणि गिरिजाप्रसादांशी  झालेली चर्चा यांचा अर्थाअर्थी संबंध लावणे अवघड जात आहे. या दोन्ही विधानांची पार्श्वभूमी, आणि आयाम पूर्णतः वेगळे आहेत.

तसेच धर्मनिरपेक्ष असणे हे आपल्याला चांगले म्हणायचे आहे की वाईट याचाही नेमका खुलासा होत नाही.

दोन देशांतील मुत्सद्यांमधील (राजकारणी म्हणा हवे तर! त्यांत कमीपणा मी मानत नाही!!) या विधानामध्ये वर्तमान आणि भविष्यातील संबंधाच्या दृष्टीने झालेली ही एक सकारात्मक देवाणघेवाण आहे. संकुचित लाभ करून घेण्याच्या भावनेचा येथे वास नाही; तसेच तो करून देण्याइतकी या घटनेची क्षमताही नाही.