अहो, उडदामाजी काळे गोरे असणारच.  काही इंग्रजांचे भाट सोडले, तर बहुसंख्य भारतीय त्यांच्याबद्दल जे बोलायचे तेच बोलतात.  पण इंग्रजांचे पाणी काही वेगळे आहे (हा भाटपणा नाही).  त्यांनी अत्याचार करतानाही कशाही का असेना, न्यायसंस्था आणल्या, रचना (त्यांच्या पद्धतीची  का होईना पण) आणली.  काही उपकार नाही केले, पण रानटीपणे एका वंशाला मारले नाही.  यात त्यांची भलावण करायची नाही, पण जर्मनीला दुसऱ्या महायुध्दात यश मिळाले असते तर हिटलर ने आपल्या सारख्या लोकांबरोबर काय केले असते या कल्पनेने शहारे येतात.

 

सुहासिनी