अमोल,
आपल्या देशामधे अप्रामाणिकपणा मोठ्या प्रमाणावर आहे असे आपले मत असल्यास आपण तो मुद्दा वेगळ्या तऱ्हेने मांडू शकला असता.
आपल्या विचित्र विधानांचा निषेध.
का इतर चौघांना त्यात काहीच वाटत नाही म्हणून शेवटी नवीन आपल्या हक्कांची जास्त जाणीव असलेली सोसायटी शोधणार ?
जर ती सोसायटी आमची आहे असे आम्हाला वाटत असेल तर आम्ही त्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करू. पळून जाणार नाही.
इतर काही देत नाहीत म्हणून मी सुद्धा का द्यावे असा (अ)विचार सावरकर प्रभृतींनी केला असता तर आजचा दिवस कसा असता याची कल्पना करा.
पण या ठिकाणी येऊन आपल्या देशातल्या समस्येवर आपल्याला मत मांडावेसे वाटले हे चांगलेच.
आपला देश आपली आई आहे हे लक्ष्यात ठेवा.
आपलाच,
---लिखाळ.