अमोलरावांच्या वतीने बोलू इच्छीत नाही, पण एका टोकाच्या भूमिकेला दुसऱ्या टोकाच्या भूमिकेने प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे, असे वाटते. ("काट्याने काटा काढावा" अथवा "सिमिलिया सिमिलिबस क्युरांटूर"* तत्त्व.)

चालू द्या. गंमत पाहत आहे.

- टग्या.

*होमिओपथीमागील तत्त्व. (Like is cured by like.) वुडहाऊसने एके ठिकाणी याचा कल्पक वापर केला आहे. "If one girl seems to be the cause of the heartbreak, apply another girl." असे काहीसे एका पात्राच्या तोंडचे वाक्य स्मरते. नेमका संदर्भ आठवत नाही, पण बहुधा एका मुलीबरोबर गैरसमज/भांडण/एंगेजमेंट मोडणे (थोडक्यात वुडहाऊसकथांमधले नेहमीचेच प्रकार) वगैरे झाल्याने निराश मनःस्थितीत गेलेल्या आपल्या मित्राला त्या निराशेतून बाहेर कसे काढायचे, यावर चर्चा चालली असता एक पात्र दुसऱ्याला म्हणते, "तुम्ही होमिओपथीच्या उपचारांचा प्रयोग का करून पाहत नाही? If one girl..." इ. इ. (थोडक्यात आपल्या हीरोला दुसऱ्या मुलीच्या "प्रेमात पाडणे" असा काहीसा "डाव" असतो.)

(प्रसंगवर्णन प्रभावीरीत्या करू शकलेलो नाही याची जाणीव आहे. खूप पूर्वी [महाविद्यालयीन दिवसांत, साधारणतः वीसएक वर्षांपूर्वी] वाचलेले असल्याने प्रसंग, किंबहुना कोणते पुस्तक तेसुद्धा, आता आठवत नाही. सन्जोप राव [किंवा इतर कोणीही वुडहाऊसवाचक] मदत करू शकतील काय?)

- टग्या.