आदरणीय चित्तोपंत,
आपणास आशा चर्चा वायफळ वाटतात तर येथे येऊन वेळ वाया का घालवता? आणि गंमत म्हणजे पुन्हा आपल्याच मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे सुद्धा टाळता (मागील चर्चांचा संदर्भ). जर या गप्पा वायफळ आहेत तर तुमच्या शेरोशायरीने काय क्रांत्या/उत्क्रांत्या केल्या आहेत? (मला साहित्या बद्दल आदर आहे. कृपया गैरसमज नको.) आणि आम्ही लोक, ज्यांना या चर्चा आवडतात, येऊन आपल्याला हे करू नका ते करू नका सांगत बसलो आहोत का??
आम्हाला वाचायला लिहायला काय आवडते ते आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती. आपापल्या आवडी निवडी नुसार लिहिता वाचता यावे यासाठी प्रशासकांनी येथे वेगवेगळे विभागही केले आहेत. आपण त्यानुसारच येथे लिहीत आहोत. आपली हुकुमशाही चालवण्यासाठी मनोगत हे संकेतस्थळ योग्य नव्हे असे वाटते!
आधी आम्ही एखाद्या धर्माच्या असहिष्णुतेबद्दल कोकलतो, दुसऱ्या धर्माच्या असहिष्णुतेबद्दल बोंबलतो. मग आमच्या प्रदेशावर, भाषेवर किती न्याय होतो आहे ह्याची आपल्याला मनस्वी चीड येते. त्यानंतर मग आम्ही एखादी जात कशी वरचढ होते आहे, यावर काथ्याकूट करतो आणि आमच्या जातीवर किती अन्याय होतो आहे यावर फालतू चर्चा करतो. मग पोटजातीवर येतो. बावने-सोमोस, चित्पावन-देशस्थ, ९६कुली-कुणबी ह्या भेदांवर बकत बसतो. ह्या गोष्टींना काही अर्थ नाही.
ही चर्चा आणि तुम्ही मांडलेले मुद्दे यात फरक आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे हे अदूरदर्शी, आपमतलबी विचारांच्या बोलण्यात असतात. तर या चर्चेच्या विषयात सदर लेखकाने असा राष्ट्रीय प्रश्न मांडला आहे ज्याने आपल्या देशाची अगोदरच शकले झालेली आहेत. आणि काश्मीरही हातातून गेला आहे/जात आहे.
वरील चर्चेत हिंदू समाज भयगंडग्रस्त कसा आहे हे कळत नाही.
त्यासाठी इतिहासाचा व समाजशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरेल. येथे मी इतिहासातले सगळे संदर्भ देऊ शकत नाही. ही या चर्चेची मर्यादा आहे. परंतू आपण "उघड्या डोळ्यांनी" त्रयस्तपणे अभ्यास केलात तर आपल्या सारख्या सुशिक्षित व्यक्तीला हे कळणे अवघड नाही. एक उदा. हिंदू संस्कृतीची जन्मभूमी असलेल्या या देशात आम्हाला गणेशोत्सवातली वा विवाहातली मिरवणूक काढताना रस्त्यात मशीद लागली तर सगळी वाद्ये बंद करून चोरासारखे आवाज न करता जावे लागते. त्यांना त्यांच्या धर्माला काटेकोरपणे पाळता यावे यासाठी त्यांना आपल्या मातृभूमीचे तुकडे करून आपण दिले. मग तरीही आपल्यावर ही बंधने का?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भडकलेल्या प्रत्येक दंगलींतील हिंदू आणि मुसलमान बळींचा 'स्कोअर' बघितला, तर हिंदूनी प्रत्येक वन-डे सामना जिंकला आहे.
काहीतरीच काय? काश्मिरातून हिंदू नामशेष होत आला आहे (जम्मू व लडाख मध्ये सुद्धा हिंदूच मार खातो आहे). असे कोणते राज्य आहे जिथे मुस्लिम लोकसंख्या कमी झाली आहे? उलट मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण सगळीकडे वाढतच आहे. आणि आपल्या देशाचा जो हिस्सा (पाक, बांगला) आपण त्यांना तोडून दिला तिथे हिंदू संपण्याच्या मार्गावर पोहचला आहे. त्या "स्कोअर"चे काय? अर्थात अशा दुर्दैवी स्कोअरमध्ये कोणत्याही बाजूने आपला सहभाग असणे हे सुद्धा वाईटच आहे. पण हाच तर चर्चेचा विषय आहे!
तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांक रक्षणाच्या जबाबदारीत आपण १०० पैकी १० गुण गमावले असतील तर आपल्याला वचन देऊन न पाळणाऱ्या पाक-बांगलादेशाने ५ गुण सुद्धा कमावले नाहीत! आणि जर आपण मुस्लिम तुष्टीकरणाच्या पाठीमागे लागलो तर राष्ट्राला फोडणाऱ्या शक्तीला खतपाणी घालत नाही आहोत का? जर हिंदूंच्या मनात देश फोडणाऱ्यांची भिती नसली असती तर हिंदू आक्रमक झाला असता का?
जर व्यापक हिंदू-मुस्लिम संबंधांवर विचार केला अन तुमच्याच भाषेत सांगायचे तर हिंदू हा सामना केंव्हाच हरला आहे. आणि त्या पराभवाची परिणिती या प्रतिकात्मक दंगलीतून दिसून येते, ती सुद्धा अभावानेच (उदा. गोध्र्याला मुसलमानांनी सीमा गाठली आणि हिंदूंचा "संयम" तुटला). मात्र वाराणसीतला हल्ला, दिवाळीतले स्फोट, हे सगळे चालू असूनही हिंदू "संयमीतच" आहे. असे एकही उदाहरण दाखवा जेव्हा मुसलमानांनी एवढी मानहानी झाल्यावर आक्रमकता दाखवलेली नाही! दाखवा ना?
कारण साफ आहे व्यवस्था, तंत्र, निमलष्कर हे हिंदूंच्या बाजूने असते.
अरे वा! तर आपल्याला अधिकार दिले तर आपण पाकिस्तानासोबत भारतालाही "फेल्ड स्टेट" म्हणायला कचरणार नाहीत असे दिसते. काही मूठभर बेजबाबदार लोकांमुळे आपण आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या निमलष्कर दलावर असे लाजिरवाणे आरोप करू शकत नाही. क्षमा करा, पण तुम्ही हे तोल गेल्यासारखे बोललात.
भिवंडीचे उदाहरण घ्या, भागलपूरचे उदाहरण घ्या... मुजप्फरनगर, लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद अन श्रीनगरचे का नको?
दंगलखोरांसाठी प्रत्येक दंगा एक वन-डे मॅच असते. त्यांनी आमचे १० मारले. आता आम्हाला ११ वर स्कोअर न्यावा लागणार ह्या कर्तव्यभावनेतून बरेच निष्पाप हातठेलेवाले, मजूर, बायापोरे मरतात.
मान्य.
पण हे दंगे होतातच का? तर त्यांना इथे सुद्धा शरियत कायदा हवा आहे. त्यांना त्यासाठी स्वतंत्र भूभाग दिलाय ना आपण? आता इथे राहायचे तर जरा मिसळून राहायला नको का? (हा प्रश्न मी माझ्या समोर "नमाजी" टोपी घालून समोरच्या क्यूब मध्ये बसलेल्या व कार्यालयात नमाज पढणाऱ्या सहकाऱ्याला पाहत पाहत लिहीत आहे).
बहुसंख्य हिंदूंसाठी आणि बहुसंख्य मुसलमानांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नाही.
पण आमच्यासाठी आहे. तर आम्हाला चर्चेचे गुऱ्हाळ चालवू द्या ना. तुम्ही का एवढा वैताग करून घेताय?
ते बिचारे रोजंदारीवर काम करतात, मेहनतमजुरी करतात. त्यांना ह्या मुद्द्याकडे द्यायला वेळही नाही.
आणि तुमच्या कविता वाचायला आहे का? तसा वेळ त्यांच्याकडे आहे असे समजून तुम्ही गज़ला लिहीत असाल तर ते साफ खोटे आहे. म्हणजे तुम्ही करता ते सगळे योग्य आणि आम्ही काही बोलले की आम्ही "एक्स्ट्रिमिस्ट"! वा रे वा, काय कायदा आहे बुवा हा? शरियत मधला आहे की काय?
अश्या वांझोट्या चर्चा आमच्यासारख्या खुर्चीवर बसून सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून ठीक असतात. त्यातून हशील काही होत नाही.
हो ना, गज़ला लिहिल्याने मात्र सगळे हशील होते! भगतसिंग, सावरकर, धिंग्रा, हे सगळे अशा चर्चा न करता गज़ला ऐकूनच क्रांतिकारक झाले. नव्हे का?????