या पत्रकार परिषदेने थोडेसे जनजागरण होईल. पण आपला आवाज परदेशी शक्तीपर्यंत जाईल का? विषेशतः काश्मिरचा नकाशा ज्या तीन देशांत विभागलेला दाखवला जातो त्यापैकी एक महासत्तेचा पिद्दू तर दुसरा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा प्रबळ देश!!!

मी अशा नकाशांवर वेळोवेळी आक्षेप घेत आलो आहे. पण येथे अमिरिकेत आपले काही चालत नाही. वेगवेगळ्या शहरांचे सिटी हॉल, युनोचे कार्यालय, वेगवेगळी कार्यालये, शाळा, वगैरे ठिकाणी अक्षेप नोंदवले आहेत. त्यांना आपल्या म्हणण्यात काही महत्व वाटत नाही. त्यांच्या दृष्टीकोणातून आपल्या म्हणण्याला साधारणतः असे बघितले जाते...

१. हा मणुष्य उगीच डोके खात आहे. कोणता तो देश अन काय त्यांच्या सीमा - त्यांच्यासाठी अमेरिका हेच जग!
२. हा आमच्या देशात येऊन आम्हाला येथे काय लावावे अन काय नाही हे सांगतोय, उद्दाम कुठला!
३. "अरे तुला विचारतोय कोण?... जा काय करायचे ते कर".
४. काय हा दुष्ट माणूस आहे? आपल्या साथिदाराला (पाकिस्तान) वाईट म्हणतो आहे. पाकिस्तान अमेरिकेचा मित्र आसल्यामुळे त्यांनी यांचा काश्मिर घेतलेला आहे असे म्हणता येऊच कसे शकेल?
५. हा अस्साच नकाशा युनो मध्ये आहे - आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर? -- हा अभ्यासू लोकांचा प्रतिसाद!