<<पण जर्मनीला दुसऱ्या महायुध्दात यश मिळाले असते तर हिटलर ने आपल्या सारख्या लोकांबरोबर काय केले असते या कल्पनेने शहारे येतात.>>

१) हिटलरचा द्वेष ज्यूंबद्दल होता,त्याने ज्यूंचा संहार केला, पोलंड वा रशियात त्याने आबालवृद्ध, महिला वगरे सरसकट जनतेच्या संहाराचे आदेश दिले नव्हते. ज्यूंवरील अत्याचार व हत्या निःसंशय अमानुष व समर्थनिय. पण म्हणून त्याने हिंदुस्थानातही तेच केले असते हा तर्क बरोबर नाही.

२) हिटलरने नेताजींना आझाद हिंद सेना स्थापण्यास सर्वतोपरी मदत केली, त्यांना जोखीम घेऊन स्वखर्चाने देशाबाहेर पूर्वेला पोहोचवले. सबब त्याने आपल्यावर आक्रमण करून अत्याचार केले असते अशी भीती व्यर्थ आहे.

<त्यांनी अत्याचार करतानाही कशाही का असेना, न्यायसंस्था आणल्या>

ज्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यावर सुनावणीआधीच निवाडा ठरलेला असतो असे न्यायालय ही तर क्रूर चेष्टा आहे. लाहोर अभियोगाचा निकाल सुनावल्यावर हु. भगतसिंहाने उपस्थित न्यायाधिशांची बोलती आपल्या मुद्देसूद भाषणाने बंद केली होती व भारतीय न्यायाधीश आगाखान यांना पवित्र आसनावर बसून असे अपवित्र कृत्य करण्यापेक्षा त्या आसनाचा त्याग करायचे खडे आवाहन भर न्यायालयात केले होते व शरमेने मान खाली घालून आगाखान उठले होते हे आपणांस माहित नसावे.

चिमूर व आष्टी येथे संतप्त जमावाने उप-न्यायदंडाधिकारी व काही पोलीसांना ठार मारले होते. त्याचा बदला म्हणून इंग्रज अधिपत्याखालील पोलीसदलाने त्या गावात शिरुन भयानक अत्याचार केले. लुटालूट तर झालीच पण ११ बलात्कार नोंदवले गेले. त्या संबंधी १४० साक्षीदार तपासाचे नाटके झाले व अखेर सर्व अधिकारी निर्दोष सुटले. न्यायाधिशांनी निकालात असे बेशरम शेरे नोंदवले की राष्ट्रद्रोही गुन्हेगार (म्हणजे सत्याग्रही व क्रांतीकारक) यांचे नातेसंबंधीत असल्यानेच या स्त्रीयांनी बलात्काराचा खोटा कांगावा केला आहे. हे इंग्रजांचे न्यायदान!

न्यायदानाचे नाटक करणारे काय आणि मी म्हणतो तेच खरे असे उघड बोलणारे काय दोघेही सारखेच गुन्हेगार.

मात्र आपल्या देशातील अनेकांची बौद्धिक इंग्रजी गुलामगीरी अजूनही कायम आहे, दोष त्यांचा नाही तर ईंग्रजाधिष्ठित व ईंग्रजधार्जिणा इतिहास शिकवणाऱ्या गेल्या ५९ वर्षातील राज्यकर्त्यांचा आहे.