मूठभर राजकारणी काहीही म्हणोत, सर्व हिंदू भयगंडग्रस्त आहेत हे विधान अवास्तव वाटते. जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवणे योग्य आहे (आणि तो योग्यवेळी उठत असतोही). कशात काही नसताना उगाच भीती दाखवणे दोन्ही समाजांच्या आणि देशाच्या हिताचे आहे असे वाटत नाही.

भयगंडापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला भय वाटते हे प्रथम स्वतःशी कबूल केले पाहिजे.

"भीती वाटते" हे कबूल केले तर आत्मविश्वास कुठे जाईल? "मला कशाचीही भीती नाही" असे स्वतःच्या मनाशी म्हणणे योग्य आहे. हे म्हणजे लहान मुलांना बागुलबुवाची भीती दाखवण्यासारखे, रोगापेक्षा उपाय भयंकर असे आहे.

हिंदू (आणि सर्व भारतीय) भयमुक्त असून कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ आहेत असे वाटते.