बाळू,
आपल्या सडेतोड उत्तरातले मुद्दे आवडले.
(पण आपण या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर येऊन 'गजल' लेखनाशी तुलना केली नसतीत तर अजून बरे झाले असते असे वाटते.)
मला आपण वर उल्लेखिलेल्या 'शरियत' बद्दल शंका आहे.
आपण म्हणालात की ,
पण हे दंगे होतातच का? तर त्यांना इथे सुद्धा शरियत कायदा हवा आहे.
तर मला असे वाटते की त्यांना शरियत फक्त विवाहा पुरताच हवा आहे. कारण चोरी करणाऱ्याचे हात तोडा वगैरे इतर शरियत कायदे त्यांना नकोच आहेत असा माझा समज आहे. या विषयी अजून माहिती असल्यास समजून घ्यायला आवडेल.
(या प्रश्नामुळे विषयांतर झाले असल्यास क्षमा असावी.)
आपला,
-- लिखाळ.