युगानुयुगाचे ब्राह्मणी वर्चस्व १९४८ मध्ये  घरदार जळाल्यामुळे गाव सोडल्यावरही आणि कूळकायद्याने जमिनी गेल्या तरीही  टिकून राहते ही नवलाचीच गोष्ट आहे.आज खेड्यात ब्राह्मण कुटुंब असलेच तरी एकादेच असते तरीही ते वर्चस्व गाजवू शकत असेल तर काश्मिरी पंडिताना येवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले नसते. अशा वर्चस्व गाजवणाऱ्या जातीस काश्मिरातून पलायन करायला लागल्याबद्दल शिवधर्मियाना अर्थातच आनंदच झाला असणार.एक वेळ भारतात सगळे मुसलमान/ख्रिश्चन झाले तरी परवडेल पण ही ब्राह्मणाची ब्याद नको!
           शिवाजी महाराजाना गोब्राह्मण प्रतिपालक असे बिरुद लावायला अर्थातच जिजाऊमातेच्या या लेकरांचा विरोध असेल‌.
            शिवधर्म हा कोणत्याही धर्म अथवा पंथाप्रमाणे सर्वांचे चांगले होवो या उद्देशानेच स्थापन झाला असणार,त्यामुळे रे.टिळकाना जसा ख्रिश्चन धर्म स्वीकारावा वाटला तसा एकाद्या ब्राह्मणाला शिवधर्म स्वीकारावा वाटला तर त्याला शिवधर्मियांची हरकत असणार नाही कदाचित तो धर्म स्वीकारताना मी ब्राह्मणी वर्चस्वाचा त्याग करत आहे असे लिहून द्यावे लागेल .
       चातुर्वर्ण्य मानत नसल्यामुळे या धर्मात जातिभेद नसणार आणि त्यामुळे २७%किंवा आता ३०%मध्ये आपला समावेश होऊ नये असे शिवधर्म स्वीकारणारे लिहून देणारच असतील.
        अकबर बादशहाने एके काळी दिने-इ-लाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता,आज त्याचे नावही फारच थोड्या लोकाना माहित आहे.पण शिवधर्माबरोबर एका नव्या युगाची पहाट उगवत असल्यामुळे त्याचे तसे होऊ नये हीच इच्छा!