<तर केवळ "दखल न घेण्याइतके क्षुद्र" किंवा फार तर "संहाराकरिता लोअर प्रायॉरिटी" म्हणून लागला असता, इतकेच.>
पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, फ्रान्स, अफ्रिकेतील अनेक देश हिटलरच्या सेनेने काबीज केले होते. यापैकी अमानुष नरसंहार कुठे झाला ते सांगा? आणि अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला त्याचे काय? त्यांना जाब न विचारणाऱ्या इंग्रजांचे राज्य तुम्हाला गोड वाटतेच की.
<त्यामुळे इंग्रजांना आणखी एक शह देऊन दुर्बल करण्याकरिता नेताजींना 'वापरताना' हिटलरचे नेताजींबद्दलचे / हिंदुस्थानविषयीचे / हिंदुस्थानवासीयांविषयीचे कोणतेही प्रेम उतू चालले नव्हते, केवळ स्वार्थ / शुद्ध 'मिलिटरी स्ट्रॅटेजी' होती.>
नेताजी सैन्य स्थापनेसाठी मदत मागायला तिथे गेले होते त्यांना हिटलरने बोलावले नव्हते. शिवाय हिटलरच्या सुसज्ज सैन्याच्या मानाने आझाद हिंद सेना ही स्थापन झाली तेव्हा फारच लहान व कमकुवत होती. अशा परिस्थितीत ही सेना हिटलरने वापरली हे पटण्यासारखे नाही. नेताजींच्या जर्मनीतील वास्तव्या विषयी व हिटलर नेताजी मुत्सद्दीपणाविषयी असे म्हणावे लागेल की मर्दाचा पोवाडा मर्दाने गावा. हिटलर स्वतः त्याच्या मातृभूमिच्या मुक्तिसाठी पेटलेला होता. आपल्याच सारखा आपल्या राष्ट्रासाठी काही तरी करू शकणारा एक राष्ट्रभक्त म्हणजे नेताजींनी त्याला प्रभावित केला असणे सहज शक्य आहे.
दुर्दैवाने इंग्रज प्रेमाने अंध झालेले लोक नेताजींना अजूनही हिटलरचा हस्तक मानतात व देशभक्त मानायला तयार नाहीत, अर्थात त्यांनी मान्ले नाही तरी काही फरक पडत नाही.
<<परंतु भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून भारतीय लष्करात लष्कराविरुद्ध बंड करणाऱ्यांना जागा नसावी. तेव्हा त्यांचे लष्करात पुनर्वसन होऊ नये, इतर कोणत्या प्रकारे त्यांचे पुनर्वसन अथवा सन्मान करावा हा स्वतंत्र भारताचा प्रश्न आहे. आणि नेहरूंनी तो सल्ला मानला होता, यात नेहरूंचे इंग्रजधार्जिणेपण निश्चितच नाही, असे वाटते. >>
नेहेरू ईंग्रज धार्जीणे होते हे जगजाहीर आहे.
आता आझाद हिंदच्या वीरांविषयीः
वस्तुस्थिती अशी आहे की आझाद हिंदच्या विरांना अखेर इंग्रजांनाही निर्दोष सोडावे लागले होते. कारण स्वच्छ होते. इंग्रज आपल्या अधिपत्याखालील भारतीय सैनिकांचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरले, नालायक ठरले. त्यांनी जपान्यांपुढे शरणागती पत्करून आपली सेना त्यांच्या हाती स्वाधिन केली होती. मग त्या सेनेने ईंग्रजांविरुद्ध हत्यार उगारले तर ते बंड होउच शकत नाही. ते जपानी सेनेन्च्या आदेशाचे पालन ठरते व लष्करी संकेताला धरून आहे.
त्याहून महत्त्वाचे - इंग्रजांविरूद्ध सर्वस्व पणाला लावणारे सैनिक आणि स्वार्थासाठी राज्य उलथून पाडणारे सत्तापिपासू लष्करशहा यांतला फरक न समजण्या इतके नेहरू दूधखुळे होते? अजिबात नाही. हे गौरव शाली लोक पुढे आले तर आपले बिंग फुटेल व जनता आपल्याला अव्हेरेल ही भीती नेहेरुंना भेडसावत होती.
<आपल्याला "असमर्थनीय" असे म्हणावयाचे आहे, अशी आशा आहे>
संपूर्ण सहमत. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.