हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की आशुतोषप्रेरित ह्या चर्चागुऱ्हाळांत सामील होण्यास अतीव दुःख होते आहे... पण हॅम्लेट यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे नाईलाज झाला आहे.

असो...

नेताजींच्या जर्मनीतील वास्तव्या विषयी व हिटलर नेताजी मुत्सद्दीपणाविषयी असे म्हणावे लागेल की मर्दाचा पोवाडा मर्दाने गावा.

हा सत्याचा अपलाप आहे, इतिहासाचा विपर्यास आहे. केवळ स्वार्थ / शुद्ध 'मिलिटरी स्ट्रॅटेजी' हीच पार्श्वभूमी या भारत-जर्मनी या विजोड विवाहास होती. हिटलर हा माथेफिरू होता, त्याच्या तथाकथित मर्दानगीची पातळी नेताजींच्या जातकुळीच्या जवळपासही पोहचणारी नव्हती.

-- जीव घेण्याचे जणू औद्योगिकीकरण करून -- १/३ देशवासीयांना मारून टाकणारा हिटलर देशभक्तीने पेटला होता हे कसे म्हणणार? अगदी साफ खोटा आहे हा दावा!

देशातील ज्यूव्यतिरिक्तही देशातील अपंग, म्हातारे, अशिक्षित, मतिमंद या साऱ्यांना मारून टाकणारा हा नराधम भारतीयांचे हत्याकांड न करता हे कदाचित काही भारतीयच म्हणू जाणे. 

जर्मनीच्या हिटलरप्रणीत तथाकथित आर्थिक प्रगतीचे कोडकौतुक फसवे होते. विनिमयदर, महिलांना घरी बसवून -- म्हणजे उपलब्ध कामगारसंख्येतून वगळून -- बेकारीचा दर कमी दाखविणे, बहुतेक सारे उत्पादन लष्करी चढाईसाठी करणे हा क्षणिक धूळफेक करण्याचा प्रकार होता, आणि स्थायी तर सोडाच पण युद्धाखेरीज काही दिवसही हे वैभव टिकविणे अशक्य होते. अर्थात भारताला -- खरेतर जर्मनार्यांखेरीज इतर सर्वांना -- गुलाम करून आणखी काही वर्षे हे जगज्जेतेपद, साम्राज्य झळकले असते कदाचित.

बाकी माथेफिरूकडे असते ती निडरता, क्रूरता होतीच. प्रचारीपणा -- बऱ्याचदा तद्दन खोटा -- हा त्याचा सर्वात मोठा गुणविशेष होता. "Propaganda," Goebbels हिटलर असे वाचा once wrote, "has absolutely nothing to do with truth."

इंग्रजांचे अत्याचार, इतर देशीयांचा दुटप्पीपणा हा स्वतंत्र विषय आहे. ज्या rise of evil चा उल्लेख झालेला आहे त्याची सांगता याच संदेशाने होते - "The only thing necessary for the triumph of evil is for good men to do nothing."