ह्या विषयावर एका जर्मन पास्टरच्या (१९४५) काव्यात्मक ओळी सांगाव्याशा वाटतात.
"ते पहील्यांदा कम्युनिस्टांसाठी आले आणि मी विरोध केला नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो,
नंतर ते ज्यूंसाठी आले आणि मी विरोध केला नाही कारण मी ज्यू नव्हतो,
ते पहील्यांदा कॅथोलीक्ससाठी आले आणि मी विरोध केला नाही कारण मी प्रोटेस्टंट होतो,
नंतर ते माझ्यासाठीच आले आणि तो पर्यंत कोणी माझ्यासाठी बोलणारा उरलाच नव्ह्ता"
ही वाक्ये खूप प्रसिद्ध असल्याने बय्राचदा वाद होतो - आधी ज्यू का आधी कम्यूनिस्ट इत्यादी...
पण यात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की हिटलरने जिप्सींचा पण वंशसंहार करायचा प्रयत्न केला. जिप्सिंचा संबंध काही हा युरोपीय वंश आणि भाषा शास्त्रज्ञ भारतीयांशी लावतात. हिटलरच्या द्रुष्टीने जर्मनच खरे आर्य होते. पण जिप्सिंना राजकीय महत्व नसल्याने त्यावर विशेष चर्चा होत नाही. एकाही जिप्सीला न्यूरेनबर्ग खटल्याच्या सुनावणीला बोलावण्यात आले नाही. तार्त्पयः दुर्बळांना मित्र नसतात.