पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, फ्रान्स, अफ्रिकेतील अनेक देश हिटलरच्या सेनेने काबीज केले होते. यापैकी अमानुष नरसंहार कुठे झाला ते सांगा?
"लोअर प्रायॉरिटी". हिटलर ज्यूंच्या संहाराच्या कल्पनेने इतका झपाटलेला होता, की हे बाकी सर्व त्याला त्यापुढे 'किस झाडकी पत्ती' / क्षुद्र / नगण्य होते / त्यांच्याकडे 'बघून घ्यायला' त्याला वेळ नव्हता / कदाचित तितकी गरज वाटली नसावी, इतकेच.
आणि अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला त्याचे काय?
अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबाँब असमर्थनीयच होता. त्याचा हिटलरच्या बरेवाईटपणाशी संबंध कसा येतो, हे कळले नाही.
त्यांना जाब न विचारणाऱ्या इंग्रजांचे राज्य तुम्हाला गोड वाटतेच की.
माझ्या याआधीच्या प्रतिसादातील (स्वाक्षरीअगोदरचा) शेवटचा परिच्छेद वाचण्याची तसदी घेतल्यास भ्रम दूर होण्यास मदत व्हावी, असे वाटते.
नेताजी सैन्य स्थापनेसाठी मदत मागायला तिथे गेले होते त्यांना हिटलरने बोलावले नव्हते.
हिटलरने नेताजींना बोलावले काय किंवा नेताजी स्वतः हिटलरकडे गेले काय, काय फरक पडतो? शत्रूला (इंग्रजांना) त्रास देऊ शकणारे आयते कोणी स्वतःहून येत असता ती संधी हिटलरने का सोडली असती?
शिवाय हिटलरच्या सुसज्ज सैन्याच्या मानाने आझाद हिंद सेना ही स्थापन झाली तेव्हा फारच लहान व कमकुवत होती. अशा परिस्थितीत ही सेना हिटलरने वापरली हे पटण्यासारखे नाही.
पाकिस्तान काश्मीरमधील अतिरेक्यांद्वारे काश्मीर 'हासिल' करू शकलेले नाही / करू शकणार नाही; त्या दृष्टीने अतिरेकी संघटना फारच लहान व कमकुवत आहेत. (हे पाकिस्तानलादेखील माहीत असावे.) परंतु अतिरेक्यांद्वारे 'लो इंटेन्सिटी वॉरफेअर'मधून पाकिस्तान भारताला / भारतीय सेनेला त्रास तर देत आहेच ना?
(इथे नेताजी अथवा आझाद हिंद सेनेची काश्मीरमधील अतिरेक्यांशी तुलना करण्याचा उद्देश नाही. केवळ पाकिस्तानची भारताविरुद्धची 'स्ट्रॅटेजी' [मराठी प्रतिशब्द?] आणि हिटलरची इंग्रजांविरुद्धची 'स्ट्रॅटेजी' यांच्यातील साधर्म्य दाखवण्यासाठी हे उदाहरण [ऍनालॉजी] दिले आहे. गैरसमज नसावा.)
नेताजींच्या जर्मनीतील वास्तव्या विषयी व हिटलर नेताजी मुत्सद्दीपणाविषयी असे म्हणावे लागेल की मर्दाचा पोवाडा मर्दाने गावा.
हे विधान बाकी काही असो किंवा नसो, पण नेताजींना अपमानकारक निश्चितच आहे.
हिटलर स्वतः त्याच्या मातृभूमिच्या मुक्तिसाठी पेटलेला होता. आपल्याच सारखा आपल्या राष्ट्रासाठी काही तरी करू शकणारा एक राष्ट्रभक्त म्हणजे नेताजींनी त्याला प्रभावित केला असणे सहज शक्य आहे.
हिटलर हा एक अत्यंत लहरी आणि मी मी करणाऱ्या आत्मकेंद्रित लोकांपैकी (अनुताईंचे वेगळ्या संदर्भातले शब्द - याचे लसणीशी साधर्म्य आजतागायत समजलेले नाही. पण तो विषय वेगळा आहे.) होता. (आपण 'द ग्रेट डिक्टेटर' हा चॅप्लिनपट पाहिला असेलच.) त्यामुळे तो एखाद्या लहरीच्या भरात नेताजींबद्दल प्रभावित झाला असे जरी मानले, तरी दुसऱ्या दिवशी तो प्रभाव उतरला नसेलच, असेही सांगता येत नाही. (इथे 'प्रभाव', 'उतरणे' वगैरे शब्द केवळ पर्यायी शब्दांच्या अभावी वापरलेले आहेत. नेताजींची एखाद्या मादक द्रव्याशी तुलना करण्याचा कोणताही उद्देश नाही. उगाच फालतू गैरसमज करून घेऊ नयेत.)
दुर्दैवाने इंग्रज प्रेमाने अंध झालेले लोक नेताजींना अजूनही हिटलरचा हस्तक मानतात व देशभक्त मानायला तयार नाहीत, अर्थात त्यांनी मान्ले नाही तरी काही फरक पडत नाही.
नेताजी हिटलरचे हस्तक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी वापरलेला मार्ग हा (साध्याच्या प्राप्तीच्या दृष्टीने) योग्य होता की नाही, हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल, पण नेताजींची देशभक्ती निर्विवाद आहे.
माझी आणि नेताजींची वैयक्तिक ओळख नव्हती आणि दुर्दैवाने नेमके काय ते सांगायला नेताजी आज हयात नाहीत, परंतु मला असे वाटते की बहुधा नेताजींची 'स्ट्रॅटेजी'सुद्धा 'माझ्या शत्रूचा शत्रू तो माझा मित्र' या न्यायाने हिटलरला काय किंवा जपान्यांना काय, इंग्रजांविरुद्ध 'वापरण्याची' असावी. अर्थात ती फसली असती तर जपान्यांच्या किंवा जर्मनांच्या अधिपत्याखाली हिंदुस्थानची अवस्था इंग्रजांच्या अधिपत्याखालील अवस्थेहूनही वाईट झाली असती, हे माझे वैयक्तिक मत आहे, पण नैतिकदृष्ट्या मला अशा स्ट्रॅटेजीत काही गैर दिसत नाही.
नेहेरू ईंग्रज धार्जीणे होते हे जगजाहीर आहे.
नेहरूंबद्दलचे 'English by education, Muslim by culture, Hindu by accident' हे विधान ऐकिवात आहे, पण तो मुद्दा इथे लागू नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की आझाद हिंदच्या विरांना अखेर इंग्रजांनाही निर्दोष सोडावे लागले होते. कारण स्वच्छ होते. इंग्रज आपल्या अधिपत्याखालील भारतीय सैनिकांचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरले, नालायक ठरले. त्यांनी जपान्यांपुढे शरणागती पत्करून आपली सेना त्यांच्या हाती स्वाधिन केली होती. मग त्या सेनेने ईंग्रजांविरुद्ध हत्यार उगारले तर ते बंड होउच शकत नाही. ते जपानी सेनेन्च्या आदेशाचे पालन ठरते व लष्करी संकेताला धरून आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे (म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्याच्या आठवणीप्रमाणे - दुर्दैवाने तेव्हा जन्माला आलेलो नसल्याने मी तेथे प्रत्यक्ष हजर नव्हतो.) आणि थोड्याफार वाचनाप्रमाणे आझाद हिंद सेनेच्या वीरांविरुद्धच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्यात येऊन आजन्म हद्दपारीची शिक्षा फर्मावण्यात आली होती, परंतु लोकक्षोभ आणि त्यानंतर नौदलाचे बंड वगैरेंच्या दबावाखाली ही शिक्षा अमलात आणण्यात आली नाही. या सैनिकांना बडतर्फी व वेतनजप्तीनंतर मुक्त करण्यात आले. (म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे. फक्त शिक्षा कमी करून मुक्ती, एवढेच म्हणता येईल.)
अवांतर: या खटल्यात या वीरांच्या वतीने वकील म्हणून खुद्द नेहरू व भुलाभाई देसाई यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले होते.
त्याहून महत्त्वाचे - इंग्रजांविरूद्ध सर्वस्व पणाला लावणारे सैनिक आणि स्वार्थासाठी राज्य उलथून पाडणारे सत्तापिपासू लष्करशहा यांतला फरक न समजण्या इतके नेहरू दूधखुळे होते? अजिबात नाही. हे गौरव शाली लोक पुढे आले तर आपले बिंग फुटेल व जनता आपल्याला अव्हेरेल ही भीती नेहेरुंना भेडसावत होती.
तो मुद्दा नाही. आझाद हिंद सेनेचे वीर हे इंग्रजांविरुद्ध सर्वस्व पणाला लावणारे स्वातंत्र्यसैनिक होत, सत्तापिपासू लष्करशहा नव्हेत, एवढे नेहरूंनाही निश्चितच कळत असावे. परंतु एक तत्त्व म्हणून व एक प्रघात पाडण्याकरिता (to set a precedent) (लष्कराच्या दृष्टीने) बंडखोरांना सैन्यात परत न घेणे हे ठीकच होते. मात्र या वीरांना (नेहरूंच्या) सरकारकडून स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारी पेन्शनसुद्धा लागू झाले, यातच सर्व आले नाही काय?
- टग्या.