विनायकराव - दुव्याबद्दल धन्यवाद! आधी झालेल्या चर्चेचे सार आपण येथे दिलेले आहेत हे खरेच. आधीच्या चर्चेत काही नवीन तपशील आढळले. तरीही माझ्या मनात उभ्या राहिलेले -- आणि वर प्रतिसादांत मांडलेले -- प्रश्न अनुत्तरितच राहतात. त्याविषयी पुन्हा लिहीत नाही.
काही नवीन प्रश्न -
- विनोबांबरोबरच्या संवाद टिळकांचा ज्ञानेश्वरीबद्दलचा किंवा मराठी भाषेविषयीचा हलका दृष्टिकोन व्यक्त करतो असे कसे म्हणता येईल?
तसेच ह्या संवादाचा स्रोत काय याचीही उत्सुकता आहे. टिळकांनी गीतेवरील कोणतेही मराठी भाष्य वाचले नव्हते हे वाक्य संवादाच्या संदर्भानुसार पाहिले पाहिजे; असे भाष्य "गीतारहस्य" लेखनासाठी वापरले नाही ह्या अर्थाने ते असावे. तसे नसेलही पण विपर्यास नसावा ही शक्यता टिळकांच्या बाबत धरण्यास बराच आधार त्यांच्या चरित्रापासून, वाटचालीपासून मिळावी.
मराठी भाष्य वाचलेले नव्हते हे सत्य नाही; आणि जरी मराठीतील सर्वच भाष्ये -- ज्ञानेश्वरीसह -- वाचली नसतील तरीही टिळकांची संतांनी मराठीतून केलेल्या उपदेशाविषयी उपेक्षेची भावना होती असे कसे म्हणणार? इतरत्र त्यांनी दिलेले दाखले, राबविलेले कार्यक्रम, केसरीतील लिखाण यांतून काय संत उपदेशाबद्दल वा मराठीबद्दल संदेश आदराचा आणि अभिमानाचाच आहे.
-
- गुरुदेव रानडेंनी इंग्रजीत अनुवाद नाकारला याची आपण दिलेली कारणमीमांसा कोणत्या लिखाणांत आहे याविषयी उत्सुकता आहे. हे लिहिण्याचे कारण आपल्यावर अविश्वास नसून मला त्यांचा वेगळ्या तऱ्हेने झालेला संवाद सापडला.
येथे सविस्तर वाचा
(हे माझे selective quotation नाही... जे पहिले सापडले तेच आहे! तसेच गुरुदेव रानडे या नावाच्या एकाहून अधिक विभूती असल्यास माहिती नाही.)
-
- वेगवेगळी भाष्ये आणि टीका वाचण्यापेक्षाही टिळकांनी गीतारहस्याला लिहिलेल्या प्रस्तावनेचा काही भाग वाचण्यास मिळाला. सर्वच प्रश्नांचा तिढा माझ्यापुरता तरी सुटला. मनातले काहूर निवळले.
टिळकांची गीतारहस्यास प्रस्तावना आपण सर्वांनीच जरूर वाचावी.