जा पोरी जा! हे वाक्य झपाट्याने उच्चारले असता होणारा शब्द.
अत्यानंदाची सीमा; अज्ञेयाच्या अफाट मैदानात संचार करण्याला मनुष्याची चिच्छक्ती उद्युक्त होते तेव्हा तिला जी दिव्य गीते ऐकल्याचा भास होतो तो या शब्दाने आधुनिक काव्यप्रवर्तक केशवसुत ह्यांनी निर्दिष्ट केला आहे.
अशी माहिती ह्या शब्दाबाबत ह. अ. भावे ह्यांच्या विस्तारित शब्दरत्नाकरात दिलेली आहे.