काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आशा भोसले यांच्या मी पाहिलेल्या एका मुलाखतीत या गाण्याच्या विषय निघाला होता. त्या वेळी त्यांनी सांगितलेला अर्थ हा साधारणपणे टिकाकार यांनी वर लिहिल्याप्रमाणेच होता. 'गे निळावंती...' ह्या कडव्यात प्रेयसीच्या अंगावरील वस्त्रांना मेघाची उपमा देण्यात आली आहे व प्रियकर तिच्या अप्रतीम लावण्याला अनावृत्त पाहू इच्छित आहे हा श्रुंगारिक अर्थ आपल्या मोठ्या बहिणीस ( आशाबाईंना) समजावून सांगताना धाकटा भाऊ ह्र्दयनाथ मंगेशकर सुरुवातीला कसा संकोचला होता पण नंतर गाण्यातील भाव नीट उतरावे म्हणून वैयक्तिक नाते बाजुला सारून संगीतकाराच्या भूमीकेतून  त्यांने गायिकेस ते गाणे अर्थासह कसे व्यवस्थित समजावून, उलगडून दाखवले हे आशाबाईंनी सांगितले.
    कै. राजा बढ हे आज अर्थ सांगण्यास  हयात नाहीत , परंतु ह्र्दयनाथांनी गीतास चाल लावण्याआधी त्यांच्याशी नक्कीच चर्चा केली असावी. तेव्हा हे गीत एक प्रणयगीत आहे व यातील चंद्र, आकाशगंगा इत्यादी उपमा आहेत असे मानण्यास हरकत नसावी.